← Bye-Laws/#142
EN
Bye-law 142Ch.7 · व्यवस्थापन समिती

ठेवावयाची इतर कागदपत्रे

अधिकृत मजकूर
ठेवावयाची इतर कागदपत्रे 142. संस्थेला खालील बाबींसाठी स्वतंत्र फाईल्स ठेवाव्या लागतील :- (एक) सदस्यत्वाचसाठीचे अर्ज (दोन) नाममात्र सहयोगी सदस्यत्वासाठीचे अर्ज (तीन) सदस्य, सहयोगी सदस्य व नाममात्र सदस्य यांची राजीनामापत्रे (चार) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व / किंवा हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधीचे अर्ज (पाच) सदस्यास सदस्य वर्गातून काढून टाकल्याची प्रकरणे (सहा) नामनिर्देशन पत्रे व ती नामनिर्देशने रद्द करण्यासंबंधीची पत्रे (सात) प्रत्येक सदस्याबरोबरच्या पत्रव्यवहाराची स्वतंत्र फाईल (आठ) सहकारी निबंधकाबरोबर झालेला पत्रव्यवहार (नऊ) बिगरशेतकी करासह मालमत्ता कराबाबतचा पत्रव्यवहार (दहा) समाईक वीजवितरणाबाबतचा पत्रव्यवहार (अकरा) मालमत्तेच्या अभिहस्तांतरणाबाबतच्या प्रकरणावरील पत्रव्यवहार (बारा) सर्व प्रकारचे करार व त्याच्याशी संबंधित कागदपत्रे (तेरा) बांधकामाबाबतच्या मंजूर योजना व त्याच्याशी संबंधित पत्रव्यवहार (चौदा) वाहने उभी करण्याच्या जागेचे वाटप करण्यासाठी अर्ज. (पंधरा) सामाईक जागेत वाहने उभी करण्यासाठी जागेचे वाटप मिळण्यासाठी आलेले अर्ज (सोळा) ज्या ज्या तारखांना बँकात रकमांचा भरणा केला असेल त्या क्रमाने लावलेल्या चलनांच्या स्थळप्रती (सतरा) दिलेल्या धनादेशाच्या स्थळप्रती (अठरा) भागपत्रांच्या स्थळप्रती (एकोणीस) भागपत्रांच्या नकला मिळविण्यासाठी आलेले अर्ज (वीस) संस्थेचा नोंदणी अर्ज, उपविधींची त्यात झालेल्या दुरुस्त्यांसह प्रत (एकवीस) नोंदणी प्रमाणपत्र (बावीस) संस्थेने दिलेल्या पावत्यांच्या स्थळप्रती किंवा मूळ पावत्यांच्या कार्बन प्रती (तेवीस) संस्थेच्या बिलांच्या आकारणीच्या स्थळप्रती किंवा कार्बन प्रती (चोवीस) मिळालेल्या कर्जाबाबतचा व मालमत्ता गहाण ठेवल्याबाबतचा पत्रव्यवहार (पंचवीस) संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या नोटिसा व कार्यक्रमपत्रिका (सव्वीस) संस्थेने तयार केलेली नियतकालिक हिशोबपत्रके (सत्तावीस) समितीने संस्थेच्या कामकाजाबाबत तयार केलेले वार्षिक अहवाल (अठ्ठावीस) सांविधिक लेखा परीक्षकाकडून आलेले लेखापरीक्षा अहवाल व तदनुषंगिक दोष दुरुस्ती अहवाल (एकोणतीस) अंतर्गत लेखापरीक्षकांकडून आलेले अहवाल व तदनुषंगिक दोष दुरुस्ती अहवाल (तीस) समितीच्या निवडणूकीबाबतचे कागदपत्र (एकतीस) सदस्यांकडून आलेल्या तक्रारी व त्याबाबतचा पत्रव्यवहार . टीप : वर नमूद केलेल्या विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांकरीता संस्थेला स्वतंत्र फाईल ठेवाव्या लागतील.

Community Discussion

Loading comments…

Sign in to ask questions or share insights about this bye-law.

Sign in →

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.

सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.

उपविधी क्र. 142: ठेवावयाची इतर कागदपत्रे | SocietySeWA