← Bye-Laws/#141
EN
Bye-law 141Ch.7 · व्यवस्थापन समिती

लेख पुस्तके व नोंदव्यांचे रेकॉर्ड ठेवणे

अधिकृत मजकूर
141. संस्था खाली नमूद केलेली लेखापुस्तके, अभिलेख व नोंदवहया ठेवील. (एक) महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील नियम 32 अन्वये विहित केलेले "आय" नमुन्यातील सदस्य नोंदवही. (दोन) महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील नियम 33 अन्वये विहित केलेली "जे" नमुन्यातील सदस्यांची यादी. (तीन) रोकड वही (चार) सर्वसाधारण खतावणी (पाच) वैयक्तिक खतावणी (सहा) मालमत्ता नोंदपुस्तक, कर्जनिवारण निधी नोंदपुस्तक (सात) महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावली 1961 अन्वये विहित केलेली "ओ" नमुन्यातील लेखापरीक्षा दुरुस्ती नोंदवही. (आठ) गुंतवणूक नोंदवही (नऊ) नामनिर्देशन नोंदवही (दहा) संस्था/सदस्य कर्ज नोंदवही/गहाण ठेवल्यासंबंधी नोंदवही (अकरा) समितीच्या सभांचे इतिवृत्त (बारा) संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (तेरा) फर्निचर, पक्के खिळवलेले सामान व कार्यालयीन सामग्री यांची नोंदवही (चौदा) संरचनात्मक (Structural Audit) आणि आग प्रतिबंधक लेखापरीक्षा( फायर ऑडिट) नोंदवही (पंधरा) नाममात्र सदस्याची नोंदवही (टेनंट ऑक्युपंट) (सोळा) क्रियाशील सदस्य नोंदवही

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.