← Bye-Laws/#140
EN
Bye-law 140Ch.7 · व्यवस्थापन समिती

सचिवाची कामे

अधिकृत मजकूर
सचिवाची कामे 140. संस्थेच्या सचिवांची कामे खाली निर्देशित केल्याप्रमाणे असतील : अनुक्रमांक | अधिकार,कामकाज व कर्तव्ये याबाबत तपशील | अधिकार,कामकाज आणि कर्तव्ये ज्या उपविधीखाली येतात त्या उपविधीचा क्रमांक 1 | 2 | 3 1 | विहित कालावधीत आणि विहित पध्दतीनुसार सदस्यांना भागपत्रे देणे. | 9 ते 10 2 | सहयोगी सदस्य, नाममात्र सदस्य यांसह सदस्यांच्या राजीनाम्याबाबत कार्यवाही करणे. | 27 ते 30 3 | नामनिर्देशन नोंदवहीमध्ये नामनिर्देशने आणि ती मागे घेतल्याबद्दलची नोंद करणे. | 32 4 | संस्थेच्या मालमत्तेची तपासणी करणे | 47 (अ) 5 | सदनिकांमध्ये करावयाच्या दुरुस्ती संदर्भात नोटीस पाठविणे | 47 (ब) (क) 6 | सदस्यांच्या हकालपट्टी बाबतची प्रकरणे हाताळणे | 49 ते 54 7 | सहयोगी व नाममात्र सदस्यत्वासहित सदस्यत्व समाप्त झाल्याची प्रकरणे हाताळणे | 55 8 | विविध कारणांसाठी संस्थेकडे आलेल्या अर्जांवर कार्यवाही करणे | 63 9 | संस्थेची देयके देण्याबाबत मागणी नोटिसा / बिले तयार करणे आणि पाठविणे | 69 10 | समितीच्या निदर्शनास आलेली संस्थेची थकबाकीची प्रकरणे हाताळणे. | 70 11 | सदनिकांचे वाटप करण्याचे पत्र देणे | 75 (अ) 12 | सर्वसाधारण सभेच्या सर्व सभांच्या नोटिसा आणि विषयपत्रिका पाठविणे | 98 13 | सर्वसाधारण सभेच्या सर्व सभांच्या इतिवृत्ताची नोंद ठेवणे | 108 14 | नव्याने स्थापन झालेल्या समितीची पहिली सभा बोलविणे | 122(ब) 15 | समितीच्या सर्व सभांच्या नोटिसा पाठविणे | 132 16 | समितीच्या सभांना उपस्थित रहाणे आणि त्यांचे इतिवृत्त नोंदणे | 136 17 | समितीने अन्यथा निर्णय घेतला नसेल ते खेरीज करुन गेल्यास हिशेबाची पुस्तके, नोंदवही आणि अन्य अभिलेख पाहणे | 143 18 | आवश्यक त्या पध्दतीत संस्थेचे हिशेबा अंतिम स्वरुपात तयार करणे. | 146 (अ) 19 | अध्यक्षांच्या मान्यतेने संस्थेच्या संबंधित कामासंदर्भात निरनिराळया प्राधिकरणांकडे संस्थेचा अभिलेख सादर करणे | 152 20 | वैधानिक आणि अंतर्गत लेखापरीक्षकांकडून आलेल्या लेखापरीक्षा ज्ञापना संदर्भात दुरुस्ती करुन लेखापरीक्षा अहवाल तयार करणे. | 153 21 | सदस्यांकडून झालेल्या उपविधी भंगाची प्रकरणे आणि त्यामुळे त्यांना भरावयाच्या दंडाची प्रकरणे समितीच्या सूचनांप्रमाणे संबंधित सदस्यांच्या नजरेस आणणे. | 165 22 | येथे ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, अशा सर्वसाधारण सभेच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960,महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 आणि उपविधी यांखालील जबाबदाऱ्या पार पाडणे. | 23 | आगामी सभेसमोर वस्तुस्थितीसह तक्रार अर्ज ठेवणे | 173

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.