Bye-law 139Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेच्या अध्यक्षाचे अधिकार
अधिकृत मजकूर
संस्थेच्या अध्यक्षांचे अधिकार
139. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960,महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 आणि संस्थेचे उपविधी यांच्या चौकटीत राहून संस्थेच्या व्यवस्थापनावर लक्ष देणे, नियंत्रण करणे, आणि मार्गदर्शन करणे हे अधिकार संस्थेच्या अध्यक्षांना असतील. आणीबाणीच्या काळांत संस्थेचे अध्यक्ष समितीचे कोणतेही अधिकार वापरण्यास सक्षम असेल. तथापि, तसे करतांना आपण या अधिकारांचा वापर कां केला या कारणांची तो लेखी नोंद करील. अध्यक्षाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला समितीच्या पुढील सभेत मान्यता दिली जाईल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.