Bye-law 138Ch.7 · व्यवस्थापन समिती
समितीचे अधिकार कर्तव्ये व कामकाज
अधिकृत मजकूर
समितीचे अधिकार, कर्तव्ये व कामकाज.
138. उपविधी क्र. 112 स अधीन राहून समिती आपल्या अधिकारांचा वापर करील आणि खाली नमूद केल्याप्रमाणे आपले कामकाज व कर्तव्ये पार पाडील.
अ.क्र. | अधिकार,कामकाज व कर्तव्ये यासंबंधातील तपशील | अधिकार,कामकाज आणि कर्तव्ये ज्या उपविधीखाली येतात त्या उपविधीचा क्र.
1 | 2 | 3
1) | सदस्यांकडून अनामत रक्कम स्वीकारण्याबाबत आणि निधी उभारण्याबाबत विचार करणे. | 11
2) | सर्वसाधारण सभेला वर्गणीचे दर ठरवून त्यांची शिफारस करण्याबद्दल विचार करणे. | 13 (अ)आणि 13 (क)
3) | गुंतवणूक आणि दुरुस्ती व देखभाल निधी, तसेच राखीव आणि कर्जनिवारण निधी उभारणे ,गुंतवणे व उपयोजित करणे या सर्व बाबीसंबंधात विचार करणे. | 12 अ (एक) आणि (दोन), 14 (अ), (ब) आणि (क) 1, 15
4) | सदस्य, सहयोगी सदस्य आणि नाममात्र सदस्य यांजकडून आलेल्या राजीनाम्यांबाबत विचार करणे आणि निर्णय घेणे | 27 ते 30
5) | समितीच्या इतिवृत्तांत नामनिर्देशन सादर करणे आणि ती मागे घेणे या बाबतच्या माहितीची नोंद होते याची खातरजमा करणे. | 33
6) | सदनिकांची तपासणी केल्यावर सचिवाच्या अहवालावर कारवाई करणे. | 47 (ब)
7) | सहयोगी आणि नाममात्र सदस्यत्वासह सदस्यत्व समाप्त झाल्याच्या प्रकरणांवर कारवाई करणे. | 59
8) | विविध कारणांसाठी संस्थेकडे आलेल्या अर्जांचा विचार करणे आणि त्यावर कारवाई करणे | 63
9) | ज्या प्रकरणी संस्थेने भांडवल / मालमत्ता यांमधील भाग आणि व्याज संस्थेने संपादन केले आहेत, ते भाग आणि व्याज यांचा परतावा करण्याबाबत कारवाई करणे | 64
10) | सदनिकांच्या वाणिज्यिक उपयोगासंबंधात विम्याचा हप्ता ठरविणे | 67 (अ) (11)
11) | उपविधी क्र. 67 (अ) खाली निर्धारित केलेल्या प्रमाणाच्या आधारे प्रत्येक सदनिकेबाबत संस्थेचे दर ठरविणे | 67(ब)
12) | सदस्यांकडून संस्थेला येणे असलेली थकबाकी वसूल करण्याच्या परिस्थितीचा आणि संस्थेची थकबाकी वसूल करण्यासाठी करावयाच्या कारवाईचा आढावा घेणे | 70
13) | संस्थेच्या थकबाकीवर व्याज आकारण्याबाबत तरतुदी केल्या आहेत, त्याची खातरजमा करुन घेणे. | 70
14) | समितीच्या एका सदस्याला, ज्यावर संस्थेचा शिक्का उमटविलेला आहे, असे अभिहस्तांतरण पत्र, भागपत्र किंवा अन्य कोणताही दस्तऐवज यांवर साक्षांकन करण्यासाठी प्राधिकृत करणे | 7 (3)
15) | प्रवर्तकाकडून (बांधकाम व्यावयायीकडून) ज्यांनी सदनिका खरेदी केल्या आहेत, त्यांना सदनिकांचे वाटप करण्यांत झाल्याबद्दलचे पत्र देणे | 74
16) | सदस्यांनी मागणी केल्यास त्यांच्या अवलोकनासाठी संस्थेचा दस्तऐवज उपलब्ध करणे | 23
17) | सर्वसाधारण सभेच्या प्रत्येक वार्षिक सभेसमोर विषय पत्रिका ठेवली जाईल याची खातरजमा करणे. | 94
18) | सर्वसाधारण सभेच्या वार्षिक सभेसमोर चर्चिले जाणारे सर्व विषय बैठकीच्या विषय पत्रिकेवर ठेवले जातील याची खबरदारी घेणे | 94
19) | आवश्यकता असेल तेव्हा सर्वसाधारण सभेची विशेष सभा बोलाविणे. | 96
20) | विद्यमान समितीची मुदत संपण्याअगोदर नवीन कार्यकारी समिती निवडण्यासाठी निवडणूक घेणे | 115
21) | निवडणुकीनंतर नवीन समिती योग्य प्रकारे स्थापन झाली आहे याची खातरजमा करुन घेणे. | 118
22) | संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करणे. | 125
23) | प्रत्येक महिन्यात समितीची एक सभा घेतली जाईल याची खातरजमा करणे. | 127
24) | समितीवरील रिक्त झालेल्या जागा भरणे. | 128
25) | समितीच्या एखाद्या सदस्याच्या राजीनाम्याचा विचार करणे. | 130
26) | समितीच्या एखाद्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकृत करण्याचा विचार करणे. | 131
27) | संस्थेच्या पगारी सेवकांकडून तारण घेणे. | 147
28) | वैधानिक आणि अंतर्गत लेखापरीक्षांचे लेखापरीक्षा दुरुस्ती अहवालांस मंजुरी देणे आणि ते संबंधित प्राधिकरणांकडे अग्रेषित करणे. | 153
29) | इमारत / इमारतींचे तसेच त्या इमारती ज्या भूखंडावर उभ्या आहेत, त्या भूखंडाचे आणि इमारतींचे अभिहस्तांतरण पत्र निष्पादित करणे. | 154
30) | संस्थेची मालमत्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आणि इमारतीची दुरुस्ती, नूतनीकरण करणे. | 155 आणि 158
31) | संस्थेच्या मालमत्तेचा विमा उतरविणे. | 160
32) | उपविधींचा भंग झाल्यास त्यासाठी करावयाच्या दंडाचा दर सर्वसाधारण सभेत सुचविणे आणि "कारणे दाखवा" नोटीसा जारी करणे. | 165
33) | संस्थेच्या उद्वाहनाची कार्यप्रणाली विनियमित करणे. | 167
34) | संस्थेच्या आवारात कोणकोणते खेळ खेळण्यास परवानगी दिली जावी याबाबतची सूचना सर्वसाधारण सभेस देणे. | 168
35) | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 आणि संस्थेचे उपविधी (जे वर निर्देशित केलेले नाहीत) याखालील बाबींचा विचार करणे व त्यावर निर्णय घेणे. | 77 ते 84
36) | संस्थेच्या आवारातील वाहने ठेवण्याच्या जागा नियमित करणे. | 78 ते 84
37) | सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जिल्हा महासंघाशी संस्था संलग्न आहेत आणि त्या महासंघाची वर्गणी नियमितपणे भरली जात आहे याची खातरजमा करणे. | 6
38) | संस्थेकडे आलेल्या तक्रार अर्जांवर कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय घेणे आणि तो निर्णय संबंधित सदस्यांना कळविणे. | 173
39) | संस्थेच्या वास्तुविशारदा बरोबर करार करणे | 157 (फ)
40) | बांधकामासाठी आलेल्या निविदांची छाननी करणे आणि त्या निविदा समितीच्या अहवालासोबत सर्वसाधारण सभेत बैठकीला सादर करणे आणि कंत्राटदाराबरोबर करार करणे. | 156 (आय)
Community Discussion
Loading comments…
Sign in to ask questions or share insights about this bye-law.
Sign in →या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.
सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.