← Bye-Laws/#131
EN
Bye-law 131Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अधिकृत मजकूर
समितीच्या पदाधिका-यांचे राजीनामे 131. अ) संस्थेचा अध्यक्ष संस्थेच्या सचिवाकडे पत्र पाठवून अध्यक्षपदाचा आपला राजीनामा देवू शकेल. ब) संस्थेचा सचिव अथवा कोषाध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षांकडे पत्र पाठवून सचिव म्हणून अथवा कोषाध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देवू शकेल. क) अध्यक्ष/सचिव/कोषाध्यक्ष यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आल्यानंतरच आणि त्यांनी आपला कार्यभार नवीन निवडून आलेल्या अध्यक्ष/सचिव/कोषाध्यक्ष यांना रीतसर दिल्यानंतरच अंमलात येईल. ड) संस्थेच्या अध्यक्षाने किंवा यथास्थिति सचिवाने किंवा कोषाध्यक्षाने त्याच्यावर सोपविलेली कामे पूर्ण केली आहेत आणि त्याने स्वत:च्या ताब्यातील संस्थेची सर्व कागदपत्रे व मालमत्ता समितीच्या समोर सादर केली आहे याबाबत खात्री झाल्यावरच समितीला त्यांचा राजीनामा स्वीकारता येईल. ई) ज्यावेळी संपूर्ण व्यवस्थापक समितीलाच राजीनामा द्यावयाचा असेल तेव्हा तो राजीनामा संस्थेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यांत येईल आणि सर्वसाधारण सभेने तो मंजूर केल्याच्या तारखेपासून तो अंमलात येईल. सर्वसाधारण सभेने संपूर्ण व्यवस्थापन समितीचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजीनामा दिलेल्या समितीने त्याबाबत निबंधकास कळविणे बंधनकारक राहील आणि त्यानुसार निबंधक अधिनियमातील कलम 77 अ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करतील. तथापि विद्यमान समिती ही निबंधकाने पर्यायी व्यवस्था करेपर्यंत संस्थेचे नेहमीचेच कामकाज पार पाडील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.