Bye-law 125Ch.7 · व्यवस्थापन समिती
पहिल्या सभेत नवीन समिती व नवीन पदाधिकारी निवडणे
अधिकृत मजकूर
पहिल्या सभेत नवीन समिती व नवीन पदाधिकारी निवडणे
125. अ) निवडणूक झाल्यावर कार्यकारी समिती अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांची समिती वरील नवनिर्वाचित सदस्यांमधून निवड करील.
ब) समितीचे अध्यक्ष किंवा यथास्थिति सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवडून आलेले पदाधिकारी ते ज्या तारखेला निवडून येतील त्या तारखेपासून पांच वर्षांच्या कालावधीसाठी पदग्रहण करतील. मात्र समितीचा कालावधी संपल्यावर ते पदाधिकारीपद सोडतील.
पदाधिका-यांविरुध्द अविश्वासाचा ठराव
परंतु असे की,ज्या पदाधिका-यांविरुध्द सदस्यांनी नोटीशीद्वारे अविश्वासाचा ठराव दाखल केला असेल आणि त्यासाठी निबंधक किंवा सहायक निबंधक यांच्या दर्जाच्या खाली नसलेल्या अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविलेल्या खास समितीच्या सभेमध्ये त्यावेळी समितीच्या अशा सभेस उपस्थित राहण्यास व मतदान करण्यास पात्र असलेल्या समितीच्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने हा ठराव पारित झाला तर अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष हे असे पद धारण करण्याचे थांबवतील.
परंतु आणखी असे की, मागील अविश्वासाच्या ठरावानंतर सहा महिन्यांचा कालावधी संपेपर्यंत संस्थेचा अध्यक्ष किंवा यथास्थिति सचिव अथवा कोषाध्यक्ष यांच्या विरुध्द दुसराअविश्वासाचा ठराव दाखल करता येणार नाही.
← Previous
124. Outgoing Chairman to handover charge to new Chairman
Next →
126. Quorum for Committee Meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.