Bye-law 124Ch.7 · व्यवस्थापन समिती
मावळत्या अध्यक्षाने नवीन अध्यक्षाकडे कार्यभार सुपूर्द करणे
अधिकृत मजकूर
मावळत्या अध्यक्षाने नवीन अध्यक्षाकडे कार्यभार सुपूर्द करणे.
124. जेव्हा नवीन समिती निवडून येईल तेव्हा मावळत्या समितीचा सचिव त्याच्या ताब्यात असलेली संस्थेची कागदपत्रे व मालमत्ता यांची सूची तयार करील व आपला कार्यभार मावळत्या अध्यक्षाच्या हाती सुपूर्द करील. निवृत होणारा अध्यक्ष समितीच्या पदाचा कार्यभार व त्याच्या ताब्यात असलेली संस्थेची कागदपत्रे व मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 160 मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदीनुसार नवीन समितीच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करील.
टीप- या उपविधीमध्ये व कोणत्याही अन्य उपविधीमध्ये वापरलेल्या "कागदपत्र" या शब्दाचा अर्थ,उपविधी क्र.141 व 142 मध्ये नमूद केलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबी आणि अंकीय स्वरुपातील आधारसामग्री/माहिती असा असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.