← Bye-Laws/#117
EN
Bye-law 117Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीवर निवडून येण्याबाबतची अपात्रता

अधिकृत मजकूर
समितीवर निवडून येण्याबाबतची अपात्रता 117. समिती सदस्य म्हणून निवडून येण्यास अथवा तिचे स्वीकृत सदस्य होण्यास कोणतीही व्यक्ती जर (अ) ती नैतिक अध:पतनाच्या अपराधाबाबत सिध्दापराधी ठरली असेल तर सिध्दापराधी (conviction) ठरल्यापासून 6 वर्षांचा कालावधी उलटल्याशिवाय; (ब) तिला संस्थेस देय असलेल्या रकमांबाबतची मागणी करणारी, नोंदणीकृत डाकेने अथवा हातबटवडयाने पाठविलेली नोटीस मिळाल्यापासून तिने तीन महिन्यांचा कालावधीमध्ये संस्थेची देय असलेली रक्कम भरण्यास कसूर केली असेल; (क) तिला अधिनियमातील कलम 79 किंवा 88 किंवा 147 अन्वये जबाबदार धरण्यांत आले असेल तर किंवा अधिनियमातील कलम 85 अन्वये चौकशीचा खर्च देण्यासाठी तिला जबाबदार धरण्यांत आले असेल; (ड) सहयोगी सदस्यांच्या बाबतीत, त्याने मूळ सदस्याचे उपविधीअन्वये विहित केल्याप्रमाणे ना हरकत प्रमाणपत्र आणि हमीपत्र, सादर केले नसेल तर; (ई) तो क्रियाशील सदस्य नसेल तर; (फ) त्याने आपली सदनिका किंवा तिचा कोणताही भाग संस्थेच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय पोटभाडयाने, लिव्ह अँड लायसन्स (परवाना नि संमती ) पध्दतीने किंवा काळजीवाहू पध्दतीने दिला असेल किंवा आपला ताबा सोडला असेल किंवा संस्थेतील आपले भागभांडवल आणि हितसंबंध विकले असतील तर पात्र ठरणार नाही.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.