Bye-law 118Ch.7 · व्यवस्थापन समिती
समितीची रचना
अधिकृत मजकूर
118. संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये, दोन तृतीयांश किंवा अधिक सदस्यांची निवड झाल्यावर, असा निवडणूक घेणारा निवडणूक अधिकारी किंवा अन्य कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी अशा सदस्यांची निवड झाल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर 7 दिवसांनी, कोणत्याही कारणांमुळे जर समिती गठीत झालेली नसेल तर तो त्या निवडून आलेल्या सदस्यांची नावे त्यांच्या पत्यासह निबंधकाकडे पाठवील. व निबंधक त्याला ही नांवे प्राप्त झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत अशी नावे प्रसिध्द करेल किंवा त्यांची नावे त्यांच्या पत्यांसह, नोटीस फलकावर किंवा आपल्या कार्यालयातील महत्वाच्या जागी प्रसिध्द करण्याची व्यवस्था करेल आणि अशाप्रकारे नावे प्रसिध्द केल्यानंतर, संस्थेची समिती गठीत झाल्याचे मानण्यांत येईल. सभासदांची दोन तृतीयांश संख्या ठरविण्यासाठी अपूर्णांक दुर्लक्षिला जाईल.
संबंधित तरतुदी
← Previous
117. Disqualification from Standing for Election
Next →
119. Cessation of a Member of the Committee
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.