← Bye-Laws/#119
EN
Bye-law 119Ch.7 · व्यवस्थापन समिती

समितीचे सदस्यत्व समाप्त होणे

अधिकृत मजकूर
समितीचे सदस्यत्व समाप्त होणे. 119 (अ) समितीवरील कोणत्याही व्यक्तीचे समिती सदस्यत्व खालील कारणास्तव समाप्त होईल. (एक) समिती सदस्याने उपविधी क्र. 117 मध्ये उल्लेखिलेल्यापैकी कोणतीही निरर्हता धारण केली असेल तर ; (दोन) तो परवानगी न घेता, समितीच्या सलग 3 मासिक सभांना गैरहजर राहिला असेल तर. समितीवरील सदस्यत्व समाप्त झालेली सूचना. ब) समितीच्या कोणत्याही सदस्याने उपविधी क्र. 119(अ) (1) खालील निरर्हतेपैकी कोणतीही निरर्हता धारण केल्यास समिती सदर बाबींची तिच्या इतिवृत्तांत नोंद घेईल व संस्थेचा सचिव समितीच्या संबंधित सदस्यास आणि मा. निबंधकास तसे कळवील. निबंधकाच्या आदेशा नंतर अशा सदस्याचे समिती सदस्यत्व समाप्त होईल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.