Bye-law 80Ch.5 · मालमत्ता व पार्किंग
वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळी जागा देण्याविषयी पात्रता
अधिकृत मजकूर
वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळया जागा देण्याविषयी पात्रता.
80. ज्या सदस्याकडे वाहन आहे असाच सदस्य इमारतीखालील किंवा आवारातील मोकळी जागा मिळण्यास पात्र राहील. वाहने उभी करण्याकरिता एकापेक्षा जास्त जागा देण्याकरिता कोणताही सदस्य पात्र असणार नाही मग ते वाहन त्याच्या मालकीचे किंवा त्याच्या नियोक्त्याने किंवा तो जिचा भागीदार आहे त्या भागीदारी संस्थेने किंवा तो जिचा संचालक आहे त्या कंपनीने दिलेले असो. जर वाहने उभी करण्याच्या जागेसाठी मागणी नसल्यामुळे इमारतीखाली किंवा आवारातील काही पट्टे रिकामे राहीले असल्यास ज्या सदस्यास यापूर्वी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळा पट्टा उपलब्ध करुन देण्यात आला असेल अशा सदस्यास इमारतीखालील किंवा आवारातील दुसरा किंवा तिसरा मोकळा पट्टा नेमून देता येईल.परंतु इमारतीखालील किंवा आवारातील दुसरा अगर तिसरा मोकळा पट्टा वर्षावर्षाच्या कराराने व ज्या कोणाला पूर्वी एकही जागा उपलब्ध करुन दिली नसेल, त्याला अशा जागेची आवश्यकता नसल्यास, उपलब्ध करुन दिला जाईल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.