← Bye-Laws/#79
EN
Bye-law 79Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळ्या जागेची आखणी करणे

अधिकृत मजकूर
वाहने उभी करण्यासाठी इमारतीखालील किंवा आवारातील मोकळया जागेची आखणी करणे 79. जेथे संस्थेच्या इमारतीखालील आधारस्तंभाच्या दरम्यान मोकळी जागा ठेवलेली आहे किंवा संस्थेच्या आवारात मोकळी जागा वहाने उभी करण्यासाठी उपलब्ध आहे अशा बाबतीत इतर सदस्यांची गैरसोय होणार नाही अशा रीतीने, संस्था इमारती खालील आधारस्तंभाजवळ किंवा आवारातील मोकळया जागेत वाहने उभी करण्यासाठी पट्टे आखून त्यांना क्रमांक देईल. संस्था सदस्यांना ज्या कारणासाठी जागा दिलेली आहे त्याच कारणासाठी सदस्य तिचा उपयोग करतात याबाबतखात्री करुन घेईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.