Bye-law 7Ch.2 · निधी
संस्थेचा निधी उभारण्याच्या पद्धती
अधिकृत मजकूर
संस्थेच्या निधी उभारण्याच्या विविध पध्दती
7. संस्थेचा निधी पुढे उल्लेखिलेल्यांपैकी एका अगर एकाहून अधिक पद्धतींचा अवलंब करुन उभारता येईल.
(अ) प्रवेश फीच्या रुपाने ;
(ब) भाग पत्र (शेअर्स) विक्रीस काढणे;
(क) कर्जे व अर्थसहाय्य घेऊन;
(ड) ठेवी स्वीकारुन;
(ई) ऐच्छिक देणगीचे रुपाने (परंतु अशी देणगी हस्तांतरिती किंवा हस्तांतरक यांच्याकडून आलेली नसावी) ;
(फ) इमारत / इमारतींच्या किंमतीपोटी अंशदानाद्वारे;
(ग) भोगवटयाचा हक्क, अभिहस्तांकन यांसह भागपत्रांच्या हस्तांतरणावरील फीच्या रुपाने;
(ह) सदनिकेच्या भोगवटयाचा राहण्याच्या हक्क हस्तांतरित करते वेळी हस्तांतरकाकडून घ्यावयाच्या अधिमूल्याच्या रुपाने ;
(आय) प्रवर्तक वा बांधकाम व्यवसायी यांच्याकडून जागा मूळ निधी (कॉर्पस फंड) उभारुन (परंतु असा निधी भूखंड/घरे, भाग व संस्थांच्या भांडवलातील हक्क हस्तांतरण करताना घेता येणार नाही);
(जे) या उपविधीन्वये परवानगी दिलेल्या अन्य कोणत्याही पद्धतीने;
(के) वैधानिक आवश्यकांद्वारे;
(ल) मोकळ्या जागा भाडेपट्टीने किंवा भाडयाने देऊन भोगवटेतर आकार आकारुन;
(म) पुनर्विकासाच्या बाबतीत मूळ निधी उभारुन.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.