← Bye-Laws/#53
EN
Bye-law 53Ch.3 · सदस्यत्व

सभासदवर्गातून काढून टाकलेल्या सभासदाचे भाग व हित संपादन करणे

अधिकृत मजकूर
सभासद वर्गातून काढून टाकलेल्या सभासदाचे भाग व हित संपादन करणे. 53. संस्थेच्या सर्व साधारण सभेने काढून टाकण्यांत आलेल्या सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध जप्त न करण्याचे ठरवल्यास, संस्था त्याची किंमत संपादन करील व संपादन केलेले सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत चुकती करण्यासाठी उपविधी क्र. 64 मध्ये घालून दिलेली कार्यपध्दतीचा अवलंब करुन त्यास ती अदा केली जाईल. काढून टाकलेल्या सदस्याने संस्थेकडे त्याच्या सदनिकेचा ताबा सुपूर्द केल्याच्या तारखेपासून किंवा त्यास बेदखल केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आंत संस्थेकडून संपादन केलेले सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत अदा केली जाईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.