← Bye-Laws/#5
EN
Bye-law 5Ch.1 · प्रारंभिक

संस्थेची उद्दिष्टे

अधिकृत मजकूर
संस्थेची उद्दीष्टे 5. संस्थेची उद्दिष्टे खालील प्रमाणे राहतील : (अ) भूखंड मालक / प्रवर्तक (बिल्डर) यांजकडून महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत अधिनियम 1963 याच्या तरतुदीनुसार आणि त्याखाली केलेल्या नियमानुसार इमारत / इमारती असलेल्या जागेतील हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध विषयक अभिहस्तांतरण करुन घेणे. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. _________ या नावाने / या क्रमांकाने ओळखली जाणारी इमारत / ओळखल्या जाणाऱ्या इमारती __________ च्या भूखंडावर / भूखंडावर भूमापन क्र. ____ / सीटीएस क्र. _____ वर गाव / तालुका बांधण्यात आलेली / आलेल्या ________ इतक्या चौरस मीटरच्या, संस्थेची नोंदणी करण्यासाठी करण्यांत आलेल्या अर्जामध्ये विशेषत्वाने वर्णन केलेली इमारत / केलेल्या इमारती किंवा (भूखंड खरेदी केलेल्या प्रकारच्या संस्थेला लागू) अ) भूमापन क्र. ____ / सीटीएस क्र. _____ असलेल्या _________ इतक्या चौ. मी. चे भूखंड / अनेक भूखंड विकत घेणे किंवा भाडेतत्वावर घेणे आणि त्यावर, सहकारी संस्थेच्या सदस्यांना त्यांच्या प्राधिकृत वापरासाठी वाटप करण्याकरिता सदनिका बांधणे किंवा ______ या नावाने ओळखली जाणारी / जाणाऱ्या भूमापन क्रमांक / सीटीएस क्रमांक ____________ असलेल्या __________ इतक्या चौ. मी. ची इमारत / इमारती विकत घेणे आणि सोसायटीच्या सदस्यांना त्यांच्या प्राधिकृत वापरासाठी सदनिकांचे वाटप करण्यासाठी इमारत / इमारती विकत घेणे. ब) संस्थेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे, देखभाल करणे आणि प्रशासन करणे. क) संस्थेच्या उद्देशपूर्तीसाठी निधी उभारणे. ड) स्वत:च्या जबाबदारीवर किंवा अन्य सहकारी संस्था किंवा अन्य संस्थेच्या सहकार्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे व त्यासाठी तरतूद करणे. इ) संस्थेचे सभासद, समिती सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये सहकारी कौशल्य वृद्धिंगत व्हावे म्हणून त्यांना सहकारी शिक्षण, प्रशिक्षण देणे. फ) उपविधीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या संस्थेच्या उद्देशपूर्तीसाठी आवश्यक किंवा इष्ट अशा सर्व गोष्टी करणे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.