← Bye-Laws/#41
EN
Bye-law 41Ch.3 · सदस्यत्व

सदस्यांनी आपापसात सदनिकांची अदलाबदली करण्यासाठी करावयाचा अर्ज

अधिकृत मजकूर
सदस्यांनी आपआपसांत सदनिकांची अदलाबदली करण्यासाठी करावयाचा अर्ज 41) ज्या सदस्यांना आपापसांत सदनिकांची अदलाबदली करावयाची असेल ते सदस्य संयुक्तपणे संस्थेच्या सचिवाकडे, खालील माहितीसह अर्ज करतील. अ. संबंधित सदस्यांची नांवे; ब. त्यांच्या आपआपल्या सदनिकांचे विभिन्न क्रमांक; क. त्यांच्या आपआपल्या सदनिकांचे चटई क्षेत्र ( चौरस मीटरमध्ये ) ; ड. संबंधित सदनिका ज्या इमारतीमध्ये/इमारतींमध्ये आहेत त्या इमारतीचा क्रमांक/इमारतींचे क्रमांक आणि नाव/नावे; ई. सदनिकांची अदलाबदल करण्याची कारणे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.