← Bye-Laws/#2
EN
Bye-law 2Ch.1 · प्रारंभिक

संस्थेचा पत्ता

अधिकृत मजकूर
संस्थेचा पत्ता 2) (अ) संस्थेचा नोंदणीकृत पत्ता पुढीलप्रमाणे राहील : ________________________________________________ (ब) पत्रव्यवहाराचा पत्ता (व्यवस्थापन समितीने ठरविला असेल त्याप्रमाणे) ________________________________________________ (क) संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यात कोणताही बदल झाल्यास, तो नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणाला व सर्व इतर व संबंधित अधिकाऱ्यांस असा बदल केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत कळविण्यांत येईल. (ड) संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यातील कोणताही बदल नियमामध्ये निर्धारित केलेली कार्यपद्धती अनुसरल्यानंतर करण्यात येईल. (ई) संस्था आपले नाव, नोंदणी क्रमांक व नोंदणीकृत पत्ता दर्शविणारा फलक संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहज दिसेल अशा ठळक जागी लावील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.