← Bye-Laws/#162
EN
Bye-law 162Ch.7 · व्यवस्थापन समिती

सभेची नोटीस पाठविणे, ठराव व निर्णय कळविणे

अधिकृत मजकूर
सभेची नोटीस पाठविणे, ठराव व निर्णय कळविणे 162 (अ) कामाचे महत्व ओळखून आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960,खाली त्यासंबंधात केलेली विनिर्दिष्ट तरतूद व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 आणि संस्थेचा उपविधी याच्या अनुषंगाने, सर्वसाधारण सभेची नोटीस देणे, सभेचा ठराव, त्यावर झालेला निर्णय संस्थेच्या सर्व सदस्यांना कळविणे संस्थेवर बंधनकारक आहे. ही सर्व माहिती त्यांच्या शेवटच्या माहीत असलेल्या पत्त्यावर पुढील पध्दतीने पाठविली पाहिजे :- (एक) हातबटवडयाने, (दोन) डाकेने किंवा देय पोच सह किंवा त्याविना नोंदणीकृत डाकेने किंवा इ-मेलने. (ब) अशा नोटीशीची / निर्णय वा ठरावाची प्रत संस्थेच्या सूचना फलकावर प्रदर्शित केल्यानंतर अशी नोटीस रीतसर आली आहे व निर्णय / ठराव रीतसर कळविण्यांत आला आहे असे समजण्यांत येईल व नोटीस मिळाली नाही अगर ठराव / निर्णय कळविला गेला नाही व म्हणून केलेल्या वा पाठविलेल्या तक्रारीमुळे नोटीस-ठराव-निर्णय यांच्या वैधतेला बाधा येणार नाही.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.