Bye-law 154Ch.7 · व्यवस्थापन समिती
मालमत्तेचे अभिहस्तांतरण
अधिकृत मजकूर
मालमत्तेच्या अभिहस्तांतरण विलेखास अंतिम स्वरुप देणे
154 (अ) समिती, सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने संस्थेच्या नावे जमीन / इमारत / इमारती यांचे अभिहस्तांतरण/मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करेल.
हस्तांतरण विलेख निष्पादित करणे
(ब) समिती, संस्थेच्या वकीलाशी सल्ला मसलत करुन जमीन आणि त्यावरील इमारत / इमारती यांचे अभिहस्तांतरण / मानीव अभिहस्तांतरण विलेखाची तपासणी करेल आणि तो विलेख मंजुरीकरिता संस्थेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवेल.
(क) संस्थेच्या सर्वसाधारण सभेने तो मसूदा विलेखाचा मंजूर केल्यावर, समिती तो कायद्यानुसार निष्पादित करील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.