Bye-law 153Ch.7 · व्यवस्थापन समिती
लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल तयार करणे
अधिकृत मजकूर
लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल तयार करणे.
153 (अ) संविधिमान्य लेखापरीक्षक व संस्थेचा अंतर्गत लेखापरीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षा अहवाल आल्यानंतर संस्थेचा सचिव, सदर अहवालात उपस्थित केलेले आक्षेप व करण्यांत आलेल्या सूचना यांस अनुलक्षून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1961 च्या नियमावलीतील नियम 73 खाली विहित केलेल्या "ओ" नमुन्यांत दोष-दुरुस्ती अहवालाचा मसुदा तयार करील व तो मसुदा लेखापरीक्षा अहवाल प्राप्त झाल्याच्या तारखेच्या लगत नंतर भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर करील. समिती लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल निबंधकाकडे आणि संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करेल.
(ब) निबंधक आणि संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल सादर करण्यास समिती कसूर करेल तर समितीच्या सर्व सदस्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 146 खाली अपराध केला असल्याचे मानण्यात येईल व कलम 147 खाली ते दंडासाठी पात्र असतील.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.