← Bye-Laws/#151
EN
Bye-law 151Ch.7 · व्यवस्थापन समिती

लेखापरीक्षकाची नियुक्ती

अधिकृत मजकूर
लेखापरीक्षकाची नियुक्ती 151. अ) संस्था, आवश्यकता आहे असे वाटत असेल तर, आपल्या लेख्यांची लेखापरीक्षा करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये अंतर्गत लेखापरीक्षकाची नियुक्ती करील आणि राज्य शासनाने मान्यता दिलेल्या लेखापरीक्षकांच्या नामिकेमधून संस्था तिच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संविधीमान्य लेखापरीक्षकाची नियुक्ती करेल. मात्र त्याच लेखापरीक्षकाची नियुक्ती लागोपाठ दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी करण्यात येणार नाही. संविधीमान्य लेखापरीक्षक आपला लेखापरीक्षा अहवाल महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 81 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे सादर करेल. ब) वित्तीय वर्ष समाप्त झाल्यावर सहा महिन्यांच्या आत व कोणत्याही प्रकरणी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याची नोटीस जारी करण्यापूर्वी लेखापरीक्षण करुन घेण्याची जबाबदारी समितीची राहील. क) अशा प्रकारे नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकाचे पारिश्रमिक संस्थेची सर्वसाधारण सभा ठरवेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.