Bye-law 150Ch.7 · व्यवस्थापन समिती
रकम निलेखित करण्याची कार्यपद्धती
अधिकृत मजकूर
रकमा निर्लेखित करण्याची कार्यपध्दती
150. उपविधी क्र. 149 मध्ये नमूद केलेल्या रकमा निर्लेखित करावयाच्या झाल्यास खालील बाबींची पूर्तता झाल्याशिवाय तसे करता येणार नाही.
अ) या रकमा निर्लेखित करण्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
ब) जर संस्था वित्त पुरवठा संस्थेची ऋणको असेल तर, त्या संस्थेने या रकमा निर्लेखित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
क) नोंदणी प्राधिकाऱ्याची परवानगी घेतली आहे.
परंतु असे की, संस्था जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा अन्य कोणत्याही वित्त पुरवठा संस्थेशी संलग्न असेल पण या संस्थांची ती ऋणको नसेल तर ती बँक किंवा ती वित्त पुरवठा संस्था यांच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही.
परंतु आणखी असे की, जर मागील लेखापरीक्षणाच्या वेळी संस्थेचे 'अ' किंवा 'ब' वर्गांत वर्गीकरण झाले असेल तर खास करुन निर्लेखित करावयाची प्रस्तावित रक्कम समाविष्ट करण्याच्या प्रयोजनाकरिता निर्माण केलेल्या बुडीत कर्ज निधीमध्ये पुरेशी शिल्लक असल्यास, बँक किंवा ती वित्त पुरवठा संस्थेच्या अशा प्रकारच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.