← Bye-Laws/#148
EN
Bye-law 148Ch.7 · व्यवस्थापन समिती

संस्थेच्या वैधानिक (Statutory) राखीव निधीत करावयाचे आंशदान

अधिकृत मजकूर
संस्थेच्या वैधानिक सांविधिक (Statutory) राखीव निधीत करावयाचे अंशदान. 148. (अ) कोणतीही कर्जे व ठेवी यांवरील व्याजाची तरतूद केल्यावर व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 65(1) व 66 आणि नियम 49(अ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे अन्य वजावटी केल्यावर संस्थेने स्वत: अगर तिच्या नावावर केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारातून लाभलेल्या निव्वळ नफ्याच्या 25 टक्के नफा, संस्थेच्या राखीव निधीकडे जमा केली पाहिजे. ब) निव्वळ नफ्यापैकी उर्वरित 75 टक्के रकमेचा विनियोग महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 50,51,52,53 प्रमाणे खालील प्रमाणे करण्यांत येईल :- शिल्लक नफ्याची वाटणी एक) भरणा झालेल्या भागभांडवलावर समितीच्या शिफारशीवरुन व वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानुसार दरसाल दरशेकडा जास्तीत जास्त 15 टक्के इतक्या दराने लाभांश देता येईल. लाभांश (dividend) देण्यासाठी मागील सहकारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी संस्थेच्या दप्तरातील नोंदीप्रमाणे भागांचे जे नोंदीधारक असतील त्यांना अशा भागांवर लाभांश देण्यांत येईल. दोन) संस्थेच्या कामकाजासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खर्च केलेल्या त्यांच्या बहुमोल वेळेच्या मोबदल्यात त्यांना निव्वळ नफ्यांपैकी जास्तीत जास्त 15 टक्केपर्यंत एवढया मर्यादेत किंवा सर्वसाधारण सभेद्वारे ठरविण्यात येईल त्याप्रमाणे मानधन देण्यात येईल. तीन) उपविधी क्र. 5 (ड) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा निश्चित करील इतकी रक्कम सामाईक कल्याण निधीच्या खाती वर्ग करण्यासाठी वितरित करण्यात येईल. चार) काही नफा शिल्लक राहिल्यास तो पुढे ओढला जाईल अगर समितीच्या शिफारशीवरुन वार्षिक सर्वसाधारण सभा ठरवील त्या पध्दतीने वापरला जाईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.