Bye-law 146Ch.7 · व्यवस्थापन समिती
दहिसेबांना अंतिम स्वरूप देणे
अधिकृत मजकूर
हिशेबांना अंतिम स्वरुप देणे
146 अ) प्रत्येक सहकारी वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत, संस्थेच्या सचिवाने अगर ज्या व्यक्तीस समितीने प्राधिकृत केले आहे, अशा व्यक्तीने मागील सहकारी वर्षाचे प्राप्ती व प्रदान विवरणपत्र उत्पन्न व खर्च विवरणपत्र व वर्ष अखेरच्या दिवशीचा ताळेबंद, महाराष्ट्र सहकारी संस्था नियमावलीतील नियम 62(एक) अन्वये विहित केलेल्या नमुन्यात तयार केली पाहिजेत व त्यासोबत मागील सहकारी वर्षाअखेर असलेल्या क्रियाशील व अक्रियाशील सदस्यांची यादी त्यांच्या नावावर भागभांडवल खात्यात जमा असलेल्या रकमा व त्यांच्या काही ठेवी असल्यास त्या ठेवी, गुंतवणूक केलेल्या रकमांचा तक्ता व ऋणको,धनको यांच्या याद्या व संस्थेचे फर्निचर, कायम बसविलेले सामान व कार्यालयीन सामग्री इ. तपशील देणाऱ्या याद्या जोडल्या पाहिजेत.
वार्षिक विवरण भरणे
ब) अधिनियम व नियम यांमध्ये विहीत केल्यानुसार संस्था वार्षिक विवरण तयार करेल व सादर करेल. संस्थेने खालील माहिती भरलेले वार्षिक विवरण 30 सप्टेंबर पूर्वी निबंधकास सादर करणे अनिवार्य आहे.
(एक) संस्थेच्या कार्याची माहिती देणारा वार्षिक अहवाल (वार्षिक माहिती)
(दोन) संस्थेच्या लेख्यांचे लेखापरिक्षीत विवरण
(तीन) संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्य केलेले नफा वाटणी पत्रक
(चार) संस्थेच्या उपविधीतील सुधारणांची सूची (असल्यास)
(पाच) सर्वसाधारण सभेची तारीख व निवडणुकीची तारीख
(सहा) अधिनियमातील व नियमातील तरतुदीनुसार निबंधकाने मागणी केलेली इतर माहिती
(सात) क्रियाशील व अक्रियाशील सदस्यांची यादी
(आठ) प्रत्येक संस्था त्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने नियुक्ती केले आहे अशा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामिकेतील लेखापरीक्षक किंवा लेखापरीक्षण करणाऱ्या व्यवसाय संस्थेचे नाव व त्याची लेखी संमती असलेले विवरण वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून एका महिन्याचे आत सादर करेल.
(नऊ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,1960 च्या कलम 75(2 अ) आणि कलम 79 (1 ब) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे विवरण पत्र दाखल करण्यात जर संस्था कसूर करेल तर निबंधक (पॅनलमधील)नामिकेतील लेखापरीक्षकाची नियुक्ती करुन संस्थेच्या हिशेबाचे लेखापरीक्षण करवून घेईल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.