← Bye-Laws/#122
EN
Bye-law 122Ch.7 · व्यवस्थापन समिती

नव्याने निवडून आलेल्या समितीची पहिली सभा, निवडणूक झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसात भरविणे

अधिकृत मजकूर
नव्याने निवडून आलेल्या समितीची पहिली सभा, निवडणूक झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांत भरविणे 122. (अ) अधिनियमातील कलम 73 अअ व उपविधी क्र. 118 अनुसार नवीन समिती स्थापन झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आंत नव्याने निवडून आलेल्या व मावळत्या समितीची पहिली सभा घेण्यांत येईल. (ब) उपविधी क्र.122(अ) च्या तरतुदींच्या अधीन राहून मावळत्या समितीचा सचिव नव्याने निवडून आलेल्या समितीच्या सदस्यांना व मावळत्या समितीच्या सदस्यांना पहिल्या सभेची नोटीस पाठवील. मावळत्या समितीच्या सचिवाने संयुक्त सभा आयोजित केली नसेल तर मावळत्या समितीचा अध्यक्ष अशी सभा आयोजित करील. दोघांनीही ही सभा आयोजित केली नसेल तर नोंदणी प्राधिकारी अशी सभा आयोजित करु शकेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.