Bye-law 9Ch.2 · निधी
संस्थेच्या सदस्यांना भागपत्रे देणे
अधिकृत मजकूर
संस्थेच्या सदस्यांना भागपत्रे देणे
9 (अ). संस्थेच्या प्रत्येक सदस्याला त्याने वर्गणी दिलेल्या भागासाठी उपविधींमध्ये विहित केलेले भिन्न अनुक्रमांक असलेले व सदस्यांचे नाव, देण्यात आलेल्या भागांची संख्या व त्यावर भरलेल मूल्य दर्शविणारे भागपत्र त्याचे भाग मंजूर झाल्याच्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संस्थेकडून देण्यात येईल.
(ब) समिती, सदस्याने अर्ज केल्यावर व त्यासोबत,
(एक) जर भागपत्र गहाळ झाले असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्रत व यासंबंधातील शपथपत्र,
(दोन) जर भाग प्रमाणपत्र खराब, जळले, फाटले, वाचता न येण्यासारखे, इ. असेल तर या संबंधातील शपथपत्र,
असा दस्तऐवज सादर केल्यावर त्यास "अशा प्रकारे चिन्हांकित" भागपत्राची दुसरी प्रत देईल.
← Previous
8. Authorised Share Capital
Next →
10. Society's seal and signature of office bearers on every share certificate
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.